8 मार्च 2024

 ले कंधों पर आकाश

सर को उठा के चले

हम विश्व की महिला 

इक्कीसवीं सदी की ओर चलें


हे गाणं 2000-2001 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत बिजिंग येथे भारतीय चमू द्वारा सादर केलं गेलं होतं , स्त्री मुक्ति संघटनेच्या Jyoti Mhapsekar यांनी लिहीलेलं हे गीत.‌


यथावकाश त्याची शेवटची ओळ बदलून 


ले कंधों पर आकाश

सर को उठा के चले

हम विश्व की महिला 

प्रगती की ओर चलें


असं पणं गायलं जाऊ लागलं. 


8 मार्च 2023 आणि आजच्या दरम्यान च्या काळात मणिपूर घडलंय. सहाजिकच आता गाणं‌ बदलायची गरज आहे. चळवळीच्या गाण्यांचा बाज जितका आश्वासक असू शकतो तितकाच तो जळतं वास्तव दाखवणारा ही असतो. 


ले कंधों पर आकाश

सर को उठा के चले

हम भारत की महिला 

उन्नीसवीं सदी की ओर चलें


गाण्याची अशी ओळ सुचवताना जो काही उद्वेग वाटतोय, तो लवकरात लवकर जावा, हीच इच्छा आहे.


मणिपूर झालं आहे असं म्हणतेय त्यात सगळ्याच राज्यांमध्ये वाढलेले स्त्रीयांवरील अत्याचार तर आहेतच. एका विद्यापीठात बायकांनी कुटुंबातील सदस्यांची कशी पारंपरिक पद्धतीने काळजी घ्यावी याचे वर्ग सुरू झाल्याचं वाचलं, तो उद्वेग ही आहे.


NSO च्या नव्याने प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार भारतातील लोकांकडून अन्नावर केल्या जाणार्या खर्चाची टक्केवारी कमी झाली आहे, म्हणजे गरीबी कमी झाली आहे असं शासकीय यंत्रणेने ढोल बजावले जाणं ही कारणीभूत आहे.


गरीबीच्या व्याख्येत फक्त जगायला आवश्यक अन्न च असत नाही. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या मूलभूत गरजा आहेत हा 21 व्या शतकाच्या सुरुवातीला रूजलेला विचार अवघ्या 24 वर्षात उलटा-पालटा करून रद्दीत घातलाय. याची खंत असणं हे एक मोठं कारण आहे, गाण्याच्या शेवटाच्या ओळी बदलण्याचं बदलण्याचं.


एकीकडे 2023 चं अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक Claudia Goldin ला मिळालं, अविभागित Economics नोबेल ची पहिली महिला, जिने बायकांच्या शिक्षण, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवन यांचा अभ्यास केला.


त्यावेळी आपल्या कडे बायकांचा श्रम बाजारातला सहभाग वेगाने कमी झालाय. Unpaid work करणार्यांची गणना, बेरोजगार म्हणून करायची गरज देखील, योजना करणार्यांना वाटत नाहीये.


असल्या कारणाने आलेला राग, उद्वेग हा फक्त भावनिक आक्रोश आहे काय?


अजिबात नाही. 


या भावना होण्यासाठी प्रेरणा विकासाच्या अर्थशास्त्राचे विविध सिद्धांत आहेत. जर माणसांनी वैज्ञानिक दृष्टीकोन, सैद्धांतिक मांडणी यांच्या आधाराने सद्यस्थिती समजत, ती स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करताना सद्भावना, सामंजस्य, परस्पर विश्वास यांची कास सोडली तर जगरहाटी ची चाकं उलट्या दिशेने फिरतात.


हे जर आता समजून न घेता नुसतेच 8 मार्च च्या नावाने केक कापले आणि greeting cards पाठवून साजरं करत बसलो, तर मग उलट्या दिशेने चालू झालेल्या प्रवासाला अधिक वेग मिळेल.


हा विचार करायचा, त्या नुसार आपल्या विविध अधिकारांवर, स्वातंत्र्यांवर गदा घालणाऱ्यांना सत्तेपासून दूर करायचं, हेच खरं मागणं आहे आजच्या दिवसाचं.


शंभरहून अधिक वर्षांपूर्वी आपल्या हक्कांच्या लढाईसाठी हजारो बायका रस्त्यावर आल्या, आपल्याला तर त्यांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर फक्त एकमेकांना हात देत, फक्त मत द्यायचं आहे. 


जिंदाबाद.


- स्वाती वैद्य, ८ मार्च 2024

Comments

Popular posts from this blog

मुक्ति की चाबी

UPA vs NDA 2004-14 vs 2014-24 critique of the graphic posted by the India Today

Partition 1947 – Learning, Unlearning and Relearning